रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाणे आरोग्यासाठी उत्तम; मिळतील ५ मोठे फायदे

    12-Jun-2022
Total Views |

tulsi1
(Image Source : Internet)
 
नागपूर : गुणकारी घटकांनी युक्त असलेली तुळशीची पाने अनेक प्रकारच्या उपचारांमध्ये वापरली जातात. यातील अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्कृष्ट मानले जातात. रोज तुळशीच्या पानांचा चहा प्यायल्याने केवळ आपली त्वचा सुधारत नाही तर वृद्धत्वाची प्रक्रियाही मंदावते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करणे देखील आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचे फायदे...
 
चयापचय प्रणाली (Metabolism System) : तुळशीची पाने आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असून जलद गतीने ती चयापचय प्रणाली दुरुस्त करते. याशिवाय गॅस, ॲसिडीटी किंवा विविध प्रकारच्या पचनाशी संबंधित विकारांमध्येही तुळशीची पाने आराम देतात.
 
बॉडी डिटॉक्सिफिकेशन (Body Detoxification) : तुळशीच्या पानांमध्ये शरीर डिटॉक्स करण्याची क्षमता असते. यातील गुणकारी घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.
 
tulsi2(Image Source : Internet) 
 
तोंडातील बॅक्टेरिया : तुळशीची पाने तोंडात लपलेले बॅक्टेरिया देखील मुळापासून नष्ट करू शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का? याचे सेवन केल्यावर तुम्हाला तुमच्या श्वासात देखील ताजेपणा जाणवेल.

सर्दी-खोकला : हिवाळा म्हटलं की सर्दी-खोकल्याच्या समस्या खूप सामान्य आहेत. अशा परिस्थितीतही तुळशीची पाने शरीराला आराम मिळवून देण्याचे काम करतात आणि आजाराशी लढण्यास मदत करतात.
 
तणाव (Stress) : तणावाशी संबंधित समस्यांवरही तुळशीची पाने गुणकारी मानली जातात. याच्या पानांमध्ये असलेले ॲडाप्टोजेन मानसिक तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.