मधुमेह, हृदयविकारापासून बचावासाठी सूर्यनमस्कार सर्वोत्कृष्ट योगासन; जाणून घ्या फायदे, आसनांची सविस्तर माहिती

    10-Jun-2022
Total Views |
 

lf new
*Image Credit: Internet
 
नागपूर :
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगासन करणे अतिशय महत्वाचे आहे. नियमितपणे योगासन केल्याने स्वतःला तणावमुक्त ठेवण्याबरोबरच अनेक आजारांच्या धोक्यापासूनही दूर ठेवता येते. तसेच मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते. आळशीपणामुळे बरेच लोक काम करण्याचा कंटाळा करतात. परंतु, योगासन हा शरीराला उत्साही आणि ॲक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो.
योगासन म्हणजे अनेक आजारांवरील रामबाण उपाय असेही म्हणतात. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असलेल्या योगासनाचे महत्वाचे आपण सर्वच जाणतो. दररोज सकाळी एक ते दोन तास योगासन करावे, असे म्हणतात. परंतु, आजच्या दगदगीच्या जीवनात प्रत्येकालाच सर्व गोष्टी घाईत आटपवायच्या असतात. मग तो योगा असो वा इतर दुसरे काम. अशावेळी सूर्यनमस्कार हा उत्तम पर्याय ठरतो. सूर्यनमस्कार एकाच वेळी १२ योगासनांचा लाभ देतो. म्हणून याला सर्वोत्कृष्ट योगासन देखील म्हटले जाते. सूर्यनमस्काराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अभिजित भारतने आयुर्वेदाचार्य निलेश वानखेडे (योगगुरू) यांच्याशी संवाद साधला.
आयुर्वेदाचार्य निलेश वानखेडे म्हणाले की, सूर्यनमस्कारला योग्य शास्त्रात कुठेही ग्रंथोक्त उल्लेख नाही. काळानुरूप प्रत्येक योगगुरूने यात जसजशी सुधारणा केली, त्या पध्दतीचा सूर्यनमस्कार आज जगभरात केला जातो. सूर्यनमस्कारात एकूण ७ आसने आणि १२ स्टेजेस असतात. सूर्य हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे. प्राचीन काळातील ऋषी-मुनींपासून ते आज युगातील प्रत्येकजण सूर्याची पूजा करतात. सूर्याची बारा नावे आहेत. ही नावे घेऊन सूर्याची आराधना करणे हे सूर्यनमस्कारात १२ स्टेज असण्याचे मुख्य कारण आहे. सूर्यनमस्कार करण्यात कोणतीही वयोमर्यादा नाही. अगदी सात-आठ वर्षांच्या मुलांपासून ते एखाद्या व्यक्तीच्या शरीराला शक्य होत असेल, असा प्रत्येक व्यक्ती सहजपणे सूर्यनमस्कार करू शकतो.
 

lf new 1 *Image Credit : Internet 
 
सूर्यनमस्कार कोणी करू नये किंवा कोणती काळजी घ्यावी
 
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीसूर्यनमस्कार करणे सर्वात चांगले आहे. बाहेर अंगणात, बागेत किंवा इतर ठिकाणी मोकळ्या जागेत सूर्यमनस्कर केल्याने शरीराला ताजी हवा मिळते. तसेच सूर्यनमस्कार करताना स्त्रियांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
  • तरुण मुली/ अविवाहित स्त्रियांनी अति प्रमाणात सूर्यनमस्कार करू नये. नियमित १०-१२ वेळा सूर्यनमस्कार करणे पुरेसे आहे.
  • तरुणींनी किंवा स्त्रियांनी मासिक पाळीदरम्यान सूर्यनमस्कर करू नये.
  • मानेचा (cervical spondylosi) आणि कंबरेचा (lumbar spondylosis) त्रास असणाऱ्या लोकांनी सूर्यनमस्कार करू नये.
सूर्यनमस्काराच्या बारा आसनांचे नाव आणि त्याची माहिती
  1. प्रणामासन किंवा नमस्कारासन : सरळ उभे रहा. उजव्या पायाचा अंगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. बोटे छातीकडे झुकलेले. पंजा जमिनीला काटकोनात. अंगठ्याचे मूळ छातीच्या मध्यभगी. कोपर जमिनीला समांतर. छाती पुढे काढा. खांदे मागे ढकलून खाली ओढा. नजर समोर ठेवा. जे स्नायू ताण-दाब कक्षेत येत नाहीत ते शांत-स्थिर मोकळे आहेत याची काळजी घ्या. थोडे थांबा. ताण दिलेले स्नायू मोकळे करा.
  2. हस्त उत्तासन : सरळ उभे रहा. उजव्या पायाचा अंगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. बोटे छातीकडे झुकलेले. त्यानंतर नमस्काराच्या स्थितीत दोन्ही हात वर न्या. शक्य होईल तितके कंबरेतून मागे झुका. थोडं थांबून पूर्वस्थित या. हात खाली करा.
  3. पादहस्तासन : सरळ उभे रहाण्याच्या स्थितीतून सावकाश कमरेतून खाली वाका. सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका. गुढघा किंवा टाचेवर ताण येणार नाही याकडे लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुडघ्याला टेकविण्याचा प्रयत्न करा.
  4. अश्‍वसंचालनासन : उजवा पाय आणि दोन्ही हात घट्ट जिमनीवर रोवा. डावापाय मागे घ्या डाव्यापायाचा चवडा जमिनीवर पक्का ठेवा. डाव्यापायाचा गुढघा जमिनीवर टेकवा. उजवा पाय गुढघ्यात वाकवा. उजव्या पावलावर बसा. त्यावर शरीराचा भार द्या. (पोटरी, मांडीचा मागचा भाग आणि छातीचे शेवटचे हाड जवळ आणा). दोन्ही हात सरळ ठेवा. त्याना खांद्यातून वर उचला. छाती पुढे काढा. खांदे वर उचला. डोके मागे झुकवा.
  5. पर्वतासन : हाता-पायाची जागा तीच ठेवा. शरीराचे वजन खांदे आणि हात यावर घ्या. खांदे वर उचला. उजवा पाय डाव्या पायाजवळ मागे घ्या. पायाला पाय घोट्याला घोटा गुढघ्याला गुढघा जुळवा. पावलाच्या दिशेला, घोट्याचा आधार घेऊन, ताण द्या. डोक्यापासून पायापर्यंत शरीर तिरक्या स्थितीमध्ये ठेवा. नजर जमिनीवर काटकोनात स्थिर ठेवा.
  6. अष्टांग नमस्कार : हाताचे पंजे व पायाचे चवडे यांची स्थिती आहे तशीच ठेवा. गुढघे जिमनीवर टेकवा. शरीराचे वजन हातावर घ्या. कोपरामध्ये वाका. हनुवटी छातीला टेकवा. साष्टांगनमस्कारासन स्थिती मध्ये कपाळ, छाती, हात, गुढघे पाय जमिनीवर टेकवा. दोन्ही कोपरे शरीराजवळ घ्या नाभिकेंद्र व पार्श्वभाग वर उचलून धरा.
  7. भुजंगासन : हाताचे पंजे आहे त्या ठिकाणीच ठेवा. पंजावर शरीराचा भार द्या. कोपरामधील वाक काढा. हात सरळ करा. खांदे वर उचला. डोके आणि खांदे मागे खेचा. पोट व कंबर दोन्ही हाताच्या मध्ये सरकिवण्यांचा प्रयत्न करा. घोटे गुढघे बांधलेले तसेच ठेवा. गुढघे जमिनीला टेकवा. छातीमध्ये हवा भरून घ्या. नजर वर आकाशाकडे लावा.
  8. पर्वतासन : हाताचे पंजे व पायाचे चवडे यांची जागा तीच ठेवा. शरीराचा मधला भाग वर उचला. कंबर हात पाय यांचा त्रिकोण तयार करा. तो वर उचलून धरा. चवडे व टाच पूणर्पणे जिमनीवर टेकवा. हात आणि पाय सरळ ठेवा. कोपर गुढघे सरळ ताणलेल्या स्थितीमध्ये ठेवा. डोके पाठीच्या रेषेमध्ये ठेवा. हनुवटी छातीला टेकवा.


lf new 2
*Image Credit: Internet
  1. अश्‍वसंचालनासन : दोन्ही हातांच्या पंजांची जागा तीच ठेवा. डावा पाय डाव्या हाताजवळ आणा. डावा पाय आणि दोन्ही हात जमिनीवर रोवा. डाव्या पावलावर बसा. त्यावर शरीराचा भार द्या. (पोटरी, मांडीचा मागचा भाग आणि छातीचे शेवटचे हाड जवळ आणा.) उजवा पाय मागे घ्या. उजव्या पायाचा चवडा जमिनीवर पक्का ठेवा. उजव्या पायाचा गुढघा आणि डाव्या पायाचा चवडा जमिनीवर टेकवा. दोन्ही हात सरळ ठेवा. त्यांना वर उचला. छाती पुढे काढा. खांदे वर उचला. डोके मागे झुकवा.
  2. पादहस्तासन : उजवा पाय डाव्या पायाजवळ आणा. सावकाश गुढघे सरळ करा. पार्श्वभाग वर उचला. सहज जेवढे वाकता येईल तेवढे खाली वाका. गुढघाकिंवा टाचेवर ताण येणार नाही कडे लक्ष द्या. हनुवटी छातीला टेकवा. कपाळ गुढघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा.
  3. हस्त उत्तासन : सरळ उभे रहा. उजव्या पायाचा अंगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये छातीच्या मध्यभागी. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. बोटे छातीकडे झुकलेले. त्यानंतर नमस्काराच्या स्थितीत दोन्ही हात वर न्या. शक्य होईल तितके कंबरेतून मागे झुका. थोडं थांबून पूर्वस्थित या. हात खाली करा.
  4. प्रणामासन : सरळ उभे रहा. उजव्या पायाचा अंगठा व टाच डाव्या पायाशी घ्या. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीमध्ये. हाताचे पंजे जुळवा. बोटे जुळवा. एकमेकांवर पक्के दाबून धरा. अंगुष्टमुल कपाळावर मध्यभागी. पंजे एकमेकांना पक्के चिकटलेले. सूर्यबिंबाकडे बघण्यांसाठी मान वर उचललेली. डोके मागे ढकलण्य्याचा जास्तीतजास्त प्रयत्न. कोपर खांद्यांच्या सरळ रेषेत ठेवण्यांचा जास्तीतजास्त प्रयत्न करा.
सुर्याचे बारा मंत्र
  1. ओम मित्राय नमः
  2. ओम सूर्याय नमः
  3. ओम खगाय नमः
  4. ओम हिरण्यगर्भाय नमः
  5. ओम आदित्याय नमः
  6. ओम अकार्य नमः
  7. ओम रवये नमः
  8. ओम भानवे नमः
  9. ओम पूष्णय नमः
  10. ओम मरिचये नमः
  11. ओम सवित्रे नमः
  12. ओम भास्कराय नमः
सुर्यनमस्काराचे फायदे 
  • शरीराची लवचिकता वास्ते
  • चरबी कमी होते
  • उच्च रक्तचाप, मधुमेह, ह्रदय विकार, स्थूलता अशा आजारापासुन बचाव करते
  • पायाचे स्नायू मजबूत होतात
  • पाठीचा करा, मानेचे स्नायू लवचिक होतात
  • रोगप्रतिकारक शक्ति वाढ