दैनंदिन आहारात तूप वापरता? यातील भेसळ कशी ओळखायची जाणून घ्या एका क्लिकवर

    10-Jun-2022
Total Views |

lifestyle 1
*Image Credit : Internet
 
मुंबई :
भारतीय जीवनशैलीत साजूक तूप हा अतिशय महत्वाचा घटक समजला जातो. मुळातच आयुर्वेदिक गुणतत्व असल्याने तुपाला दैनंदिन आहारात मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे अनेक जण चेहऱ्यावर उजळी आणण्यासाठी नियमित आहारात तुपाचा वापर करतात. मात्र गेल्या दोन वर्षांत तुपात प्रचंड भेसळ होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशात घराच्याघरी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने तुपाची गुणवत्ता तपासू शकता.तुपामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होते.
 
आरोग्याला पोषण तत्त्वांचाही पुरवठा होतो. विशेष म्हणजे पूर्वी तूप घरीच तयार करण्याची पद्धत होती मात्र काळ बदलत गेला आणि तुपाची घरघुती निर्मितीही काही अंशी इतिहासजमा झाली. आता प्रत्येकजण तूप बाहेरून विकत घेतो, त्याच्या किमंतीही विविध प्रकारच्या असतात. त्यामुळे तुपात भेसळ तर नाही ना? असे प्रश्न मनात घुटमळतात. शिवाय काही नामांकित कंपन्यांचे तूप बाजारपेठेत उपलब्ध आहे, ज्या कंपन्या 'आमचेच तूप शंभर टक्के शुद्ध' असल्याचे वारंवार सांगतात. भेसळयुक्त तुपाचा वापर केल्यास कित्येक आजारांची लागण होण्याची भीती असते. आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत, ज्याअंतर्गत तुपातील भेसळ तपासणे सहज शक्य होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी ओळखता येईल तुपातील भेसळ...
  1. एका भांड्यामध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. जर तूप लगेचच वितळलं आणि त्यास गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे. तसेच जर तूप वितळण्यास वेळ लागत असल्यास आणि त्यास हलका पिवळा रंग आल्यास तूप भेसळयुक्त आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.
  2. तुपामध्ये भेसळ करण्यात आली आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी नारळाच्या तेलाचाही वापर केला जाऊ शकतो. डबल-बॉयलर पद्धतीचा उपयोग करून एका जारमध्ये तूप वितळवत ठेवा आणि वितळवलेले तूप दुसऱ्या जारमध्ये भरा आणि जार फ्रीजमध्ये ठेवून द्या. जर तूप आणि नारळाच्या तेलाचा थर वेगवेगळ्या स्वरुपात जमा झाला तर तुम्ही वापरत असलेले तूप भेसळयुक्त आहे, हे लक्षात येते.
  3. टेस्ट ट्युबमध्ये एक मोठा चमचा तूप गरम करत ठेवा. यामध्ये चिमूटभर साखर आणि समान मात्रेत हायड्रोजन क्लोराइड (Hydrogen chloride) मिक्स करा. टेस्ट ट्युबच्या खालील बाजूस गुलाबी किंवा लाल रंग दिसल्यास तूप भेसळयुक्त आहे.
  4. आपल्या हातावर एक चमचा तूप घ्या आणि थोड्या वेळाने ते आपोआप विरघळू लागल्यास तूप शुद्ध आहे, हे समजून जा.
  5. तसंच तूप हातावर रगडल्यानंतरही घट्ट होत असेल आणि त्यास कोणत्याही प्रकारचा सुगंध येत नसेल तर तूप भेसळयुक्त आहे.
  6. भेसळयुक्त तूप ओळखण्याची आणखी एक पद्धत. तुपामध्ये थोडेसे आयोडीन सोल्युशन मिक्स करा. यानंतर आयोडीन सोल्युशनचा रंग बदलल्यास तुपामध्ये स्टार्चची भेसळ करण्यात आलीय, हे लक्षात घ्यावे.
या साध्या-सोप्या पद्धतींची मदत घेऊन आपण शुद्ध की भेसळयुक्त तूप वापरत आहात, हे जाणून घेऊ शकता. आरोग्याचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.