'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' असे का म्हटल्या जाते; जाणून घ्या अंडे का फंडा

    06-Dec-2022
Total Views |

benefits of eating egg
(Image Source : Internet)
 
नागपूर :
प्रत्येकाचे जीवन अत्यंत व्यस्त झाले आहे. जीवनशैली देखील बदलली आहे. अशात आरोग्य बिघडणे हे अत्यंत सामान्य बाब झाली आहे. अशात प्रत्येकाला पोषणाची आवश्यकता भासते. याच संदर्भात आम्ही आता तुम्हाला 'संडे हो या मंडे रोज खाओ अंडे' अस का म्हटल्या जात यामागील अंडे का फंडा समजावून सांगणार आहोत.
 
प्रत्येकाला शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषण आणि व्यायामाची गरज असते.अशा परिस्थितीत अंड्याचे सेवन केल्याने शरीराला पोषण मिळण्यास मदत होते. अंड्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, जे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थासाठी देखील फायदेशीर असतात. जाणून घ्या अंड्याच्या काही महत्वपूर्ण फायद्यांबद्दल.
 
अंडी खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. याचे कारण म्हणजे त्यात असणारा पोषणा साठा. त्यामध्ये प्रामुख्याने प्रोटीन, इसेन्शियल फॅटी ॲसिड, आयरन, विटामिन ए, बी ६, बी १२, फोलेट, अमिनो ॲसिड, फासकोरस आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर, यात आढळणारे विटामिन ए, विटामिन बी १२ आणि सेलेनियम हे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय, अंड्यामध्ये असणारे झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
 
अंडी हे शरीराच्या हाडांसाठी देखील अतिशय फायदेशीर असते. एका वैज्ञानिक संशोधनात असे आढळून आले आहे की, अंड्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात आणि हाडांशी संबंधित आजार होण्याचा धोका देखील कमी असतो. अंड्यातील कॅल्शियम, विटामिन डी आणि प्रोटीन हे यासाठी फायदेशीर ठरतात. अंड्याचे सेवन हे त्वचा आणि केसांसाठी किती फायदेशीर आहे. हे तर बऱ्याच लोकांना माहिती आहे. अंड्याच्या सेवनाने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच, केसांच्या वाढीसाठी आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी देखील अंडी अगदी उपयुक्त ठरतात.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.