आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ही खास भजी; आजच आस्वाद घ्या

    31-Dec-2022
Total Views |

healthy and tasty methi pakoda(Image Source : Internet/Representative image)
 
नागपूर:
उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असा कुठलाही ऋतू असो भजे असे पदार्थ आहे, ज्याला कुठल्याही कधीही नकार देता येत नाही. भजेचे अनेक प्रकार असतात. ब्रेड पकोडा, कांदे भजे, बटाट्यचे भजे, मिरची भजे, ही त्यातील काही विशेष लोकप्रिय असणारे प्रकार आहेत. भज्यांची एक विशेषता म्हणजे, बेसनामध्ये कुठलीही भाजी घाला आणि एक नवीन प्रकारचे भजे तयार होतात. भज्याचे अगदी सोप्या पद्धतीने आणि नवनवीन प्रकार करता येतात. सोबतच गरमागरम भजे हे अगदी चविष्ट असल्याने लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात.
 
चला तर आज जाणून घ्या, आरोग्यासाठी फायदेशीर मेथीचे भजे अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवता येईल.
 
सामग्री:
बेसन- १ वाटी
बारिक चिरलेली मेथीची भाजी- १/२ कप
धने -१ छोटा चमचा
हिरवी मिरची-४ (बारिक चिरलेली)
बारिक चिरलेला कांदा - १
ओवा- आवडीनुसार
जीरे - १ छोटा चमचा
मीठ- गरजेनुसार
तिखट-१ छोटा चमचा
हळद-१/२ छोटा चमचा
हिंग-चुटकीभर
बेकिंग सोडा- चुटकीभर
तेल-तळण्यासाठी

कृती:
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये धने, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओवा, जिरे, मीठ, तिखट, हळद, घालून चांगल्याने मिक्स करून घ्या. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि मेथी घाला. आता यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून भाज्यांचे मिश्रण तयार करून घ्या. पाणी घालताना लक्षात ठेवा मिश्रण थोडे घट्ट बनवायचे आहे. मिश्रण तयार झाले की ते बाजूला ठेऊन द्या. आता एका फ्राइंग पॅन किंवा कढई मध्ये तळण्यासाठी तेल गरम करा. तेल गरम झाले की गॅस मंद करा. आता मिश्रणात हिंग, बेकिंग सोडा घाला आणि यावर छोट्या चमचा गरम तेल घाला. आता चमच्याच्या मदतीने तेल मिश्रणात चांगल्याने मिक्स करून घ्या. आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे भजे तेलात टाका. भजे एका बाजूने हलके तपकिरी रंग जखले की चमच्याच्या मदतीने पालटून द्या. आता दोन्ही बाजूने भजे खुशखुशीत झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्या. गरमागरम भजे तयार आहेत.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.