'या' घरगुती उपायांनी मिळवा ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स पासून सुटकारा

    27-Dec-2022
Total Views |

Easy Face Pack For Blackheads Whiteheads
(Image Source : Internet/ Representative image) 
 
नागपूर:
हिवाळा आला की त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. हिवाळ्यात शरीराबरोबर त्वचेला देखील विशेष काळजीची आवश्यकता असते. त्यातही ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स झाल्यास ते काढणे आणखीनच कठीण होते. अशात चेहऱ्याची काळजी घेणे जणू आव्हानात्मक ठरते. ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांच्या चेहऱ्यावर देखील होतात. हे टाळण्यासाठी अनेकजण बाजारातील केमिकलयुक्त क्रीम किंवा फेसवॉशचा उपयोग करतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेला नुकसान देखील होऊ शकते. तर, काही महिला पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार घेतात. मात्र, एवढे महागडे उपचार करूनही त्याचे परिणाम किती चांगले होतील आणि त्याचा प्रभाव किती काळ टिकेल याची खात्री कोणी घेऊ शकत नाही. विशेषत: तेलकट त्वचा असलेल्या लोकांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सपासून मुक्ती मिळवू शकता.
 
Easy Face Pack For Blackheads Whiteheads
 (Image Source : Internet/ Representative image)
 
१. ओट्सचे फेस पॅक
ओट्सला सर्वप्रथम मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता १ चमचा ओट्स पावडर वाटीमध्ये घ्या. यामध्ये गुलाबजल घालून हलके घट्ट असे फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक जवळपास २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. पॅक कोरडे झाले की चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. दर आठवड्यात एकदा या पॅकचा उपयोग केल्याने तुमच्या चेहऱ्यावर फरक दिसायला लगेल.
 
२. वाफ घ्या
हिवाळ्यात सर्वात सोपा आणि अधिक फायदेशीर ठरणारा उपाय म्हणजे वाफ घेणे. परंतु चेहऱ्यासाठी वाफ घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, वाफ घेतल्याने चेहऱ्याची रोम छिद्रे खुलतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स सहज निघून जातात. घरी वाफ घेताना पाण्यात चंदन पावडर किंवा लिंबाचा रस घातल्याने त्वचेला दुप्पट फायदा होतो आणि ग्लो वाढण्यास मदत होते.
 
Easy Face Pack For Blackheads Whiteheads
 (Image Source : Internet/ Representative image)
 
३. फेस मास्क
फेस मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात १ चमचा लिकोरिस (ज्येष्ठमध) पावडर, अर्धा चमचा मीठ, १ चमचा गुलाबजल घ्या. हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवा. हा मास्क चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स सहज निघून जातील.
 
४. मुलतानी मिट्टी
एका भांड्यात एक चमचा मुलतानी मिट्टी, चिमूटभर हळद, अर्धा चमचा कडुलिंबाच्या पानांची पावडर, पाणी, दूध, लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी होण्यास मदत होईल. सोबतच चेहऱ्यावर ग्लो सुद्धा दिसेल.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.