'या ' घरगुती उपायांनी मिळेल सर्दी, खोकलामध्ये आराम

    23-Dec-2022
Total Views |
 
home remedies for cough and cold
 (Image Source : Internet/representative)
 
 
जगभरात कोरोनाच्या काहाराला जवळपास तीन वर्षे होत आहेत. परंतु आता कोरोनाचे नवीन प्रकार 'ओमिक्रोन' आपले पाय पसरवत आहे. कोरोनाकाळात जगभरातील लोकांच्या जीवचे हाल झाले होते. अगदी सामान्य वाटणाऱ्या सर्दी, खोकला आणि तापाने कोरोनाचे स्वरूप घेऊन अनेकांचा जीव घेतला होता. हल्ली पुन्हा अशीच स्थिती पुन्हा पाहायला मिळू शकते. ताप, सर्दी, खोकला, थकवा, डोकेदुखी हि ओमिक्रोन ची काही सामान्य लक्षण आहेत. तसेच बदलत्या वातावरणामुळे व्हायरलचे प्रमाण देखील खूप वाढले आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी काही घरगुती उपायांचा तुम्ही उपयोग करू शकता. 
  
सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि ताप अगदी सामान्य झाले आहे. परंतु हे सामान्य वाटणारे त्रास कधी मोठ्या आजाराचे स्वरूप घेतील हे सांगता येत नाही. यासाठी तुम्ही या काही घरगुती उपायांनी आपले आरोग्य टिकवून ठेऊ शकतो. 
या काही घरगुती उपायांचा करा उपयोग :
  • हिवाळ्यात घश्यात दुखणे फार सामान्य असते. अशात पिण्यासाठी कोमट पाण्याचे उपयोग केल्याने घशे दुखी पासून अराम मिळेल.
  • घश्यातील कर्कशपणा, इन्फेक्शन, सर्दी - खोखल्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे आलं. चहा किव्हा काढ्यात आले घालून सेवन केल्याने या सर्व समस्यांपासून आराम मिळू शकतो.
  • वातावरणात होणारे बदल मानवी शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीवर देखील परिणाम करू शकते. रोग प्रतिकारक शक्ती सुदृढ ठेवण्यासाठी शरीराला व्हिटामिन सी ची आवश्यकता असते. हे व्हिटामिन सी आवळ्यात भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे आवळे खाणे शरीरासाठी भरपूर फायदेशीर ठरू शकते. 
  • हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शरीरात कफ निर्माण होतो. हे होऊ नये यासाठी उपाय म्हणून वाफाऱ्याचा उपयो करू शकता. दररोज १० ते १५ मिनिटांसाठी वाफारे घेणे शरीरासाठी उपयुक्त असते. 
  • रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दुःख पिल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. दुधाचे शरीराला बरेच फायदे आहे. तसेच हळद हे अँटिबायोटिक असल्याने शरीरातील किटाणूंचा नाश करून शरीर सुदृढ ठेवण्यास मदत करते. 
 
या गोष्टींची काळजी घ्या : 
  • तळलेले किंवा जास्त तेलकट पदार्थांचे सेवन टाळा. 
  • जंक फूड किंवा थंड पदार्थांचे सेवन जसे आईस्क्रीम, कोल्डड्रिंक यांचा उपयोग टाळा. 
  • सार्वजनिक ठिकाणावर जाताना मास्कचे उपयोग करा. 
  • दररोज जास्तीत जास्त पाणी प्या . 
  • बाहेरून आल्यावर सर्वप्रथम हाथ पाय स्वतःच केल्यानंतरच घरात प्रवेश करा.  
हे सर्व उपाय करत असताना चिकित्सकांशी सल्ला नक्की घ्या. श्वास घेण्यात अडचण होत असल्यास लगेच चिकसकांची भेट घेऊन उपचार सुरु करावा. 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.