राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन; प्रदूषण एक जागतिक समस्या

    02-Dec-2022
Total Views |

pollution a global problem
(Image Source : Internet) 
नागपूर:
 
अवेळी पाऊस, कडाक्याची थंडी, तीव्र उन्हाळा या सर्वबाबी जलवायू प्रदुषणामुळे घडत असल्याचे निदर्शनास येते. प्रदूषण हे आज एक मोठी जागतिक समस्या बनले आहे. वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण हे प्रदूषणानेमुख्य प्रकार आहेत. हल्ली उद्भवणाऱ्या अनेक सामान्य या क्लायमेट चेंगमुळे होत आहेत. म्हणायला जरी सोपे वाटत असणारे हे प्रदूषण आपल्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत घातक ठरत आहे.
 
प्रदूषणाचा विपरीत परिणाम मनुष्यावरच नव्हे तर प्राण्यांवर आणि भूतलावरील संपूर्ण वनस्पतीं होताना दिसून येतो. प्रत्येकावर याचा वाईट परिणाम होत आहे. या गंभीर समस्येबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या दृष्टीने भारतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले असून, देशात दरवर्षी २ डिसेंबर हा दिवस जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिवस म्हणून साजरा केला जातो. यामागील मुख्य उद्देश म्हणजे, सर्वसामान्य लोकांमध्ये प्रदूषण नियंत्रणाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यामुळे होणाऱ्या आपत्तींना टाळण्यासाठी लोकांना प्रेरित करणे. अर्थातच प्रदूषणामुळे होणारे घातक परिणाम आणि त्याबद्दलचे उपाययोजना याबाबत संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.
 
प्रदूषणाच्या विपरीत परिणामांमुळे दरवर्षी लाखाच्या संख्येत लोकांचा मृत्यू होतो. यावरून प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम असल्याचा अंदाज लावता येईल. हा दिवस साजरा करण्यासाठी आजचाच दिवस का निवडला असावा? यामागे देखील कारण आहे. खरंतर, १९८४ मध्ये भोपाळ मध्ये एका कीटकनाशक प्लांट मधून जवळपास ४५ टन मिथाईल आयसोसायनेट लीक होऊन जवळपासच्या राहणीमानात पसरली होती. या विषारी गॅसमुळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला होता. बऱ्याच लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास देखील भोगावा लागला होता. त्या दुर्घटनेत ज्या लोकांनी जीव गमावला त्यांच्या स्मरणात आजचा दिवस हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो.
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.