HIV/AIDS म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या याची लक्षणे आणि संपूर्ण माहिती

    01-Dec-2022
Total Views |

world aids day
 
नागपूर :
एचआयव्ही अर्थात ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (Human Immunodeficiency Virus) हा अत्यंत गंभीर आजार आहे. एचआयव्ही या नावाप्रमाणेच हा आजार शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर सरळ हल्ला करतो आणि शरीर कमकुवत करतो. एचआयव्ही संसर्ग पुढे एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (Acquired Immunodeficiency Syndrome) म्हणजेच एड्सचे रूप धारण करतो. अशा गंभीर आजाराविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसल्याचे लोकांमध्ये या आजाराबद्दल जनजागृती करण्याची उद्देशाने दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा केला जातो.
 
HIV ची सर्वसाधारण लक्षणे
एचआयव्ही लैंगिक संपर्क, रक्त आणि रक्त उत्पादनांच्या (IV ड्रग्सचा गैरवापर) संपर्कात आल्याने प्रसारित होतो. ताप, लिम्फ नोड्स वाढणे, वजन कमी होणे आणि त्वचेवर पुरळ येणे ही याची सामान्य लक्षणे आहेत.
 
जागतिक आकडेवारीनुसार, ३७ दशलक्षाहून अधिक लोक एचआयव्ही एड्सच्या (HIV/AIDS) गंभीर समस्येने ग्रसित आहेत. एका अहवालानुसार, या आजारामुळे सुमारे ७ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. एचआयव्ही संसर्ग असा आजार आहे ज्यासाठी अद्याप कुठलेही औषध किंवा लस उपलब्ध नाही.
 
अशी झाली सुरूवात
जागतिक एड्स दिन पहिल्यांदा १९८७ मध्ये साजरा केल्या गेला. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथील जागतिक आरोग्य संघटनेत जेम्स बन आणि थॉमस नेटर या दोन सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांनी याची कल्पना पुढे आणली होती. नंतर, १९९६ पासून, UNAIDS (एचआयव्ही/एड्स वर संयुक्त राष्ट्रसंघ कार्यक्रम) त्याचे आयोजन आणि प्रचार करण्याची जवाबदारी सांभाळत आहे. पुढे ३० नोव्हेंबर २०१७ रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून घोषित केले.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.