हिवाळ्यात गूळ खाण्याचे ५ मोठे फायदे; जाणून घ्या

    30-Nov-2022
Total Views |

benefits of jaggery
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
 
हिवाळा आला की घरातील गृहिणी परंपरेनुसार शेंगदाणे गुळाचे लाडू, गजक, गुळपट्टी, चिक्की असे अनेक गुळाचे प्रकार करायला सुरु करतात. अनेक घरांमध्ये दैनंदिन जेवणात देखील गुळाचा समावेश केला जातो. याचे कारण म्हणजे, गूळ हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. गुळाचा उपयोग सर्दी दूर करण्यासाठी देखील केला जातो.
 
हल्ली पोटाचे आजार खूप वाढत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जंक फूड आणि विस्कळीत जीवनशैली. हल्लीच्या लोकांचे जीवन फार व्यस्त झाले आहे. अशात घरी बनवलेल्या जेवणापेक्षा लोकांना बाहेरचे, हॉटेलमधील चमचमीत जेवण अधिक पसंत पडते. मात्र, सततच्या बाहेरच्या जेवणाने पोटाचे विकार होणे सामान्य बाब झाली आहे. अशा परिस्थितीत गूळ उपयुक्त ठरू शकतो.
 
गुळाचा प्रभाव उष्ण मानला जातो. गूळ खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया निरोगी राहते. यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून आराम देखील मिळतो. चला तर मग जाणून घेऊया आरोग्यासाठी फायदेशीर असे गुळाचे फायदे...
 
गूळ खाण्याचे फायदे :
 
१. शरीरातील रक्ताची पातळी वाढते
शरीरात रक्ताची कमतरता असणे ही मोठी समस्या आहे. या आजाराला ॲनिमिया असे म्हणतात. ॲनिमियाच्या रुग्णांना गूळ खाल्ल्याने मोठे फायदे होऊ शकतात. गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढते. त्यामुळे ॲनिमियाच्या रुग्णांनी दररोज गुळाचा एक छोटा खडा खाल्ल्याने त्यांच्या शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर होऊ शकते. गूळ शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतो. तसेच यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते.
 
२. पिंपल्स कमी होतात
गूळ शरीराला साफ करणारे एक एजेंट म्हणून काम करतो. फुफ्फुसे, घसा, पोट, आणि आतडे स्वच्छ करण्यासाठी गूळ हा एक उपयुक्त पदार्थ आहे. तरुणांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येणे सामान्य आहे. या समस्येचा उपाय देखील गूळ आहे. दररोज थोडासा गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे होतील आणि चेहरा देखील उजळेल.
 
३. पचनक्रिया निरोगी राहते
गुळात मुबलक प्रमाणात फायबर आढळतो. जेवणानंतर गूळ खाल्याने पोट निरोगी राहण्यास मदत होते. तसेच, पचनक्रिया देखील मजबूत होते. पचनक्रिया स्वस्थ असली तर बरेच आजारही दूर जातात. यामुळे शरीर निरोगी आणि स्वस्थ राहण्यास मदत होते.
 
४. सांधेदुखीपासून आराम
हिवाळा येतो तेव्हा तो आपल्यासोबत अनेकांसाठी सांधेदुखी देखील घेऊन येतो. सांधेदुखीचा त्रास केवळ वयस्करांपर्यंतच मर्यादित नसून प्रत्येक वयोगटातील लोकांना याची समस्या होऊ शकते. अशावेळी याची आधीच काळजी घेणे उत्तम. गूळ आणि आल्याचे सेवन केल्याने सांधेदुखीपासून सुटका होऊ शकते.
 
५. सर्दी खोकल्यापासून आराम
हिवाळ्यात वातावरण थंड झाले की ताप, सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते. परंतु, जर तुम्ही नियमितपणे गुळाचे सेवन करत असाल, तर यापासूनची तुम्हाला आराम मिळू शकतो.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.