Skin Care : हिवाळ्यात हेल्दी आणि ग्लोइंग त्वचा हवीये? मग जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स

    16-Nov-2022
Total Views |

skin care in winter
 (Image Source : Internet)
नागपूर :
इतर हंगामाच्या तुलनेत हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. हिवाळ्यात कोरड्या आणि थंड हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होत जातो. त्यामुळे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचेवरील ओलावा (Moisture) कमी होत असल्यामुळे त्वचा कोरडी होणे, फाटणे, तसेच त्वचेची चमक (Glow) कमी किंवा गायब होणे, अशा अनेक समस्या उद्भवतात. अशात आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
 
हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी बरेच जण विंटर ब्युटी टिप्स देखील फॉलो करतात. तुम्ही सुद्धा काही सोप्या टिप्सच्या मदतीने आपल्या त्वचेची काळजी घेऊन त्वचा अगदी हेल्दी आणि ग्लोइंग बनवू शकता. त्यामुळे आज आपण अशाच काही विंटर स्पेशल स्किनकेअर टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत.
 
हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी काही बेसिक टिप्स
१. हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे बरेचजण पाणी कमी पितात. पण हे अत्यंत चुकीचे आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने त्वचेची चमकही वाढते. याबरोबरच चेहऱ्यावरील डागांचा रंग देखील कमी होत जातो आणि त्वचा साफ होते.
 
२. त्वचा कोरडी पडू नये यासाठी त्वचेला मॉईश्चराइज करणे आवश्यक असते. यासाठी वेळोवेळी त्वचेवर मॉइश्चराइजर लावत राहावे.
 
३. हिवाळ्यात गाजर, बीट, डाळिंब, अननस, सफरचंद, सीताफळ अशा हंगामी फळांचा आपल्या आहारात नक्कीच समावेश करायला हवा. याने त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते.
 
४. हिवाळ्यात बरेच जण खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करतात. पण यामुळे त्वचा पेशी जळू शकते आणि चेहरा आणखी डल दिसतो. म्हणून आंघोळीसाठीचे पाणी जास्त गरम असून नये, याची काळजी घ्यावी.
 
५. बाहेरून आल्यावर सर्वप्रथम कापूस आणि कच्च्या दुधाच्या मदतीने चेहरा स्वतःच करा. कच्चे दूध नैसर्गिक क्लिन्सिंग मिल्क म्हणून काम करते. त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चराइजर लावा.
 
६. चेहऱ्याची त्वचा ही फार नाजूक असते. त्यामुळे त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. यासाठी जास्त केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी तुम्ही कोरफड (Alovira) चा उपयोग करू शकता. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्याबरोबरच त्वचा क्लीन करण्याचे कामही करते.
 
 या अगदी सोप्या आणि घरी करता येईल अशा सोप्या टिप्सच्या मदतीने या हिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेऊन नक्कीच हेल्दी आणि ग्लोइंग स्किन मिळवू शकता.
 
 
 
अशाच ताज्या घडामोडींशी अपडेट राहण्यासाठी अभिजीत भारत न्यूज पोर्टलच्या ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक तसेच युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.