"न्युमोनिया नाही तर बालपन सही" घोषवाक्याद्वारे जनजागृती

    15-Nov-2022
Total Views |

nimoniya
imaga source internet

नागपूर,
आरोग्य विभागामार्फत न्युमोनियाचा प्रतिबंध व बचाव करण्यासाठीच्या उपाययोजानाबाबत 12 नोव्हेंबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत बालकांमधील सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
न्युमोनिया हा आजार फुफ्फुसांना तीव्र स्वरूपात होणारा तसेच नेहमी दिसून येणारा सर्वसामान्य संसर्ग आहे. हा संसर्ग बहुतांशी विषाणू किंवा जिवाणूमुळे होतो. हा संसर्ग झालेल्या बालकांना खोकला येणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, छाती आत ओढणे, ताप येणे अशी लक्षणे असतात. न्युमोनिया आजाराची लक्षणे ओळखून तत्काळ उपचार घेतल्यास हा आजार पुर्णपणे बरा होतो.
सध्या भारतात दर वर्षी न्युमोनिया मुळे मोठया प्रमाणात बाल मृत्यु होत असतात. त्यांचे प्रमाण 2025 पर्यंत दर हजारी 3 पर्यंत कमी करावयाचे आहे. न्युमोनिया आजार टाळण्यासाठी लहान बालकांना 6 महिने निव्वळ स्तनपान करावे व आपल्या बाळाचे ठरावीक वयोगटात (पहिला डोज 6 व्या आठवडयात तर दुसरा 14 व्या आठवडयात, बुस्टर डोज 9 व्या महिन्यात ) न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन घेतल्याची खात्री करावी. बाळाचे आरोग्य केन्द्रात जाऊन संपूर्ण लसीकरण करून घ्यावे. या मोहिमेत आशा घरोघरी जाऊन समुपदेशन करणार आहे. त्यावेळी त्या "न्युमोनिया नाही तर बालपन सही" या घोषवाक्याचा वापर करणार आहे.
तरी सर्व नागरीकांनी न्युमोनिया आजाराचा प्रतिबंध करून वेळेत उपचार करावा व न्युमोनिया आजाराविषयी असलेले गैरसमज व चुकीच्या कल्पना दूर करून न्युमोनिया प्रतिबंधाकरिता आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.